धवल यशाने तुझ्या लाभू दे मायपित्यांना कीर्ति ।
परीक्षेस या आज शुभेच्छा तुजला देतो आम्ही ।।
गुरुजनांनी आजवरी जे तुजसी दिधले ज्ञान
परिश्रमाने, स्वाध्यायाने केले तू विकसित ।
त्या अभ्यासा प्रकट कराया, असे हीच संधी
उगा कशाला परीक्षेस मग भ्यावे सांग मनी ।।
पालक, गुरुजन पद वंदोनी आशीष त्यांचे घ्यावे
शांत मनाने, प्रसन्नतेने परीक्षेस हे जावे ।
बुद्धिदेवता मंगलमूर्ती ह्रुदयांतरी ठेवावी
ऋद्धि सिद्धि बघ सहजच येतील यशमाला घेउनी ।।
सर्व विद्यार्थीमित्रांना, परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !