Tuesday, March 6, 2012

वसंत

वसंत म्हणजे ऋतुंचा  राजा. साहजिकच त्याचे फलांच्या राजाशीही नाते आहेच. आणि म्हणूनच कोकणात वसंताचे दर्शन अधिक विलोभनीय असते. खरं सांगायचं तर कोकण परिसरात या काळात सारी सृष्टी म्हणजेच एक काव्य असतं ! त्या सौंदर्यसागरातील हा एक थेंब नजरेला गवसलेला....

सौंदर्याचे कुंभ बहुत हे
पदोपदी वाटेत सांडले ।
जणू प्रदर्शन विभवाचे हे
परामात्म्याने इथे मांडले ।।

हर्षभरीत हा वायू सांगे
वसंताची चाहुल लागली ।
मनास जुळवित प्रीती धागे
करवंदीची जाळी फुलली ।।

आम्रतरुंना  आला मोहर
सुगंध त्याचा करितो धुंद ।
पंचमात गाउनिया सुस्वर
जपे कोकिळा अपुला छंद ।।

रोमांचित फणसाची कुवरी
हितगुज करिती माडपोफळी ।
बोंडूची या लज्जत न्यारी
अमृतानुभव देती शहाळी ।।

1 comment:

  1. श्रावणातले क्षण हे कोवळे ऊन्हातले, स्पर्शूनी गार वारे गाई गाणं हे मनातले.



    निळ्या भोर आकाशात आभाळ कसे दाटले

    निळ्या भोर आकाशात आभाळ कसे दाटले

    दाटलेल्या आभाळातून इंर्धधनू हे हासले



    श्रावणातले क्षण हे कोवळे ऊन्हातले, स्पर्शूनी गार वारे गाई गाणं हे मनातले.



    पहाटेच्या ऊन्हात रिमझिम पावसाचे थेंब पडले

    सुर्याच्या किरणांनी दवबिंदू  हे चमकले

    चमकलेल्या दवबिंदूत गवताच्या पाती हि डोलले 



    श्रावणातले क्षण हे कोवळे ऊन्हातले, स्पर्शूनी गार वारे गाई गाणं हे मनातले.

    Pratik Palkar 7208737622

    ReplyDelete